Friday, 2 October 2009

आवडीने भावे हरिनाम घेशी

आवडीने भावे हरिनाम घेशी

तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे||

नको खेद करू कोणत्या गोष्टीचा

पती लक्ष्मीचा जाण तसे, जाण तसे||

आवडीने भावे हरिनाम घेशी|

सकळ जीवांचा तू करीतो सांभाळ

तुज मोकळील ऐसे नाही, ऐसे नाही||

आवडीने भावे हरिनाम घेशी|

जैसी स्थिति आहे तैसा परी राहे

कौतुकु तू पाहे संचिताचे, संचिताचे||

आवडीने भावे हरिनाम घेशी|

एका जनार्धनी भोग प्रारब्धाचा

हरीकृपे त्याचा नाश आहे, नाश आहे||

आवडीने भावे हरिनाम घेशी

तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे||

Shri Eknaath wrote this abhang more than 400 years ago.. but the deep meaning of this is sometimes understood when I feel depressed seeing the state of today's society. It has been one of my favourites abhangs and I am trying to find it online... in vain. Somehow started singing this since morning.. dont know why

No comments:

Post a Comment